घरराजकारण“निवडणूक सुधारणांचा नव्हे, सत्ता बळकावण्याचा कट”

“निवडणूक सुधारणांचा नव्हे, सत्ता बळकावण्याचा कट”

राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) सुरू असलेल्या वादावरून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन आणि एसआयआर मधील कथित अनियमितता यांचा संदर्भ देत, हा लढा निवडणूक सुधारणांसाठी नसून सत्ता बळकावण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीत अराजकता पसरवण्याचा किंवा घटनात्मक संस्थांवर हल्ला करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.

ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे आणि एसआयआर रद्द करावे, या मागण्यांसाठी आंदोलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधक सत्ता मिळवण्यासाठी तरुणांना अराजकतेकडे ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संस्थांची बदनामी करणे हा राजकीय संधीसाधूपणा असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रउभारणीसाठी संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर संविधान आणि घटनात्मक संस्थांना नुकसान पोहोचवल्याचा आरोप करत १९७५ मधील आणीबाणी आणि १९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख केला. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनादरम्यान १९९० मध्ये कारसेवकांवर झालेल्या गोळीबारानंतर समाजवादी पक्षाचे सरकार वाचवण्यात काँग्रेसने भूमिका बजावल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरून काँग्रेसला लक्ष्य करताना सिंह यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला आणि एम. एस. गिल यांचा उल्लेख केला. मतदार ओळखपत्रे लागू झाल्यानंतर काँग्रेसला बहुमत मिळवण्यात अपयश आल्याचा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा:

डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

“दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो”

निखिल वागळेंनी सर्वोच्च न्यायालयापुढे नाक घासले

मक्कातील मशिदीच्या पावित्र्यभंगाचा आरोप; दोन बांगलादेशींना फाशी

काँग्रेस ३७ वर्षांपासून उत्तर प्रदेशात सत्तेबाहेर असल्याचे सांगत, हा मतचोरीचा परिणाम आहे की पक्षाच्या कामगिरीतील अपयश, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला. “लोकशाही हिंसाचार घडवण्याचा परवाना देत नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर टीका केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version