घरराजकारणबच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले

बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले

पत्रकार परिषदेत दिली माहिती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर गुरुवार, १३ जुलै रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही, हे स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

गेले पाच वर्षे या सरकारमध्ये पाहत आहात. यासाठी मी उद्धव ठाकरेंचे आभार. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं. त्यानंतर जे काही नवीन समीकरणं जुळायला लागले तेव्हा आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याबाबत मागणी केली होती. पण ते काही झालं नाही जर ते झालं असतं तर आम्हाला गुवाहाटीला जायची गरज पडली नसती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं. ही माझ्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. माझ्या गुवाहाटीला जाण्यामुळं हे दिव्यांग मंत्रालय मिळालं आहे. या भेटीसाठी मी त्यांचा गुलाम म्हणून काम करेन त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत,” अशी भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

नवाब मालिकांना उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला

दुबई, ऑस्ट्रेलियामधील किमतीत भारतात टोमॅटोंची विक्री

रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप आणि चारित्र्य हनन करत आहेत. यापुढं आम्ही दिव्यांगांसाठी, शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. त्यामुळे मंत्रीपदाचा दावा सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, आज हा निर्णय न घेता भेट घेतल्यानंतर हा निर्णय घ्यावा. त्यामुळे १७ जुलै रोजी भेट होईल आणि १८ जुलै रोजी निर्णय जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version