घरक्राईमनामासंजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना केलेलं वक्तव्य संजय राऊत यांना भोवणार आहे. नागपूरमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी तक्रार केली आहे. स्मशानात गोवऱ्या रचून या अशा आशयाचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

संजय राऊत यांच्याविरुद्ध एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणावरून संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली होती . त्यावेळी त्यांनी मातोश्रीवर यायचं असेल तर स्मशानात गोवऱ्या रचून या, २० फूट खोल खड्डा खणून या अशा आशयाचे वक्तव्य केले होते.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी  

एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उठवत टीका केली होती. त्यानंतर इंडियन बार काऊन्सीलने संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संजय राऊत हे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत बोलताना सांभाळून बोलावं, असं याचिकेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version