घरराजकारणनवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिल्याचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पुढे सरसावले आहेत. संजय पांडे यांनी या आरोपांना उत्तर देताना खार पोलिस स्थानकातील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे.

आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला हीन प्रकारची वागणूक मिळत असल्याचा गंभीरता आरोप राणा यांनी केला आहे. मला पोलिसांनी पाणीही दिले नाही असा दावा नवनीत राणा यांनी केला होता. त्या संबंधीचे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले होते. तर लोकसभेने या प्रकरणाची दाखल घेत मुंबई पोलिसांना २४ तासाच्या आत या प्रकरणाचे स्पष्टीकरण द्यायला सांगितले होते.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याचा मुक्काम २९ एप्रिलपर्यंत कारागृहातच

एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

भारताविरोधी प्रसार करणारे १६ युट्यूब चॅनल्स ब्लॉक

एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक!

त्यानंतर आता संजय पांडे यांनी या प्रकरणातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे खार पोलिस स्थानकात बसलेले दिसत आहेत. तर ते यावेळी चहा पितानाही दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ‘आम्ही आणखीन काही बोलण्याची गरज आहे का?’ असा सवाल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version