घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाजिओ विणणार १६०० उपग्रहांचं जाळं |

जिओ विणणार १६०० उपग्रहांचं जाळं |

भारतातील सॅटेलाइट इंटरनेटच्या बाजारपेठेत सध्या एलॉन मस्क यांची स्टारलिंक, भारती समूहाची वनवेब आणि मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ स्पर्धेसाठी उतरू पाहत आहेत. भारताच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या भविष्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगू लागली आहे. मात्र, या स्पर्धेला आता तंत्रज्ञानासोबतच परवानग्या आणि बाजारपेठेतील वर्चस्वाच्या वादाचीही किनार मिळाली आहे. पण, या सर्व चर्चेपलीकडे भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. आजवर मोबाइल टॉवर आणि फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे विस्तारले; आता दुर्गम गावांपासून बेटांपर्यंत आणि सीमावर्ती भागांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी अवकाशातील उपग्रहांचा पर्याय पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिओने मांडलेली १,६०० उपग्रहांची योजना लक्षवेधी ठरते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version