घरक्राईमनामाकाँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप

काँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. सुनीत वाघमारे यांच्यावर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी किंवा नेत्यांच्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मावर बलात्कार केल्याचा आरोप होता. रेणू शर्मा ही धनंजय मुंडेंची दुसरी बायको करूणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडेंवर या आरोपांमुळे राजीनामा देण्याचा दबाव होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे मुंडेंच्या पाठीशी राहिल्याने मुंडेंनी राजीनामा देण्याचे टाळले.

हे ही वाचा:

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

ठाकरे सरकारमधील दुसरे मंत्री आणि ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे अशा शिवसेनेचे मंत्री असलेल्या संजय राठोड यांना अशाच एका प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. संजय राठोड यांचे पूजा चव्हाण नावाच्या मुलीशी संबंध होते आणि त्यातूनच ती गरोदर झाली. एका रुग्णालयात तिचं नाव पूजा राठोड असं देऊन तिचा गर्भपात करण्यात आला, असे आरोप आहेत. या सगळ्या प्रकारातून या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामध्ये अनेक ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. या क्लिप्समधला आवाज हा संजय राठोड यांचाच आहे असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपाकडून दबाव वाढल्यामुळे संजय राठोड यांना १५ दिवसांचे मौन आणि हजारोंच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करून देखील राजीनामा द्यावा लागला.

राष्ट्रवादीचे मुंडे आणि शिवसेनेचे राठोड यांच्या प्रकारणांनंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version