घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक आर्थिक सल्ला भारतीयांच्या पथ्यावर पडलेला आहे. सोन्याचे दर घसरतील हे मोदींना ठाऊक होते, असे ठामपणे सांगता येत नाही, परंतु देशहितासाठी वर्षभर सोने खरेदी करू नका, अशी जाहीर विनंती त्यांनी जनतेला केली तेव्हापासून सोन्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली. सल्ला ऐकून ज्यांनी सोने खरेदी करण्याचे लांबणीवर टाकले ते आज मोदींना दुवा देत असतील. मोदी हे अर्थतज्ज्ञ नाहीत, परंतु अनेकदा त्यांचे निर्णय अर्थतज्ज्ञ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षाही उजवे ठरले आहेत. भारतात सोनेही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सणावारा निमित्त सोन्याची खरेदी केली जाते. एका अर्थाने नियमितपणे सोन्याचा संचय केला जातो. पिढ्यान्‌पिढ्या हे सुरू असते. १० मे रोजी देशवासियांना आवाहन केले होते की, देशहितासाठी नागरिकांनी वर्षभरासाठी सोन्याची खरेदी टाळावी. हा सल्ला लोकांना आवडणार नाही, हे त्यांना ठाऊक असावे. परंतु ऐकायला आवडतील असे सल्ले देण्यापेक्षा जे उपयुक्त आहेत, असे सल्ले देण्याकडे मोदींचा कल आहे. सोन्याच्या खरेदीबाबत त्यांनी दिलेला सल्ला त्यात पठडीतील होता. काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी मोदींवर प्रचंड आगपाखड केली होती. देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली होती. तेव्हापासून आजपर्यंत सोन्याच्या दरात २० टक्के घसरण झाली आहे. अजूनही सोन्याचे भाव खाली येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या ३५०० डॉलर प्रति औंस असलेले सोने येत्या काही वर्षांत १० हजार डॉलर प्रति औंस होईल अशी शक्यता जेफ्रीज या वित्त संस्थेने सप्टेंबरच्या ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version