घरबिजनेसभारतातील उत्पादन क्षेत्राची गत नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च

भारतातील उत्पादन क्षेत्राची गत नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च

पीएमआय नऊ महिन्यांच्या उच्चांकावर, ५६ अंकांवर पोहोचला

भारतातील उत्पादन क्षेत्रातील (मॅन्युफॅक्चरिंग) आर्थिक घडामोडींनी नोव्हेंबरमध्ये वेग पकडला आहे. उत्पादन क्षेत्राचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) वाढून नऊ महिन्यांच्या उच्चांकी ५६ अंकांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक ५४.७ अंकांवर होता. उत्पादन आणि नव्या ऑर्डर्समध्ये झालेली वाढ हे या सुधारणेचे प्रमुख कारण असल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या पीएमआय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

मात्र, याच काळात सेवा क्षेत्रातील (सर्व्हिसेस) वाढीचा वेग काहीसा मंदावला. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील वेगवान वाढीचा एकूण अर्थव्यवस्थेवरील परिणाम काही प्रमाणात संतुलित झाला. परिणामी, एचएसबीसी फ्लॅश इंडिया पीएमआय कंपोझिट आउटपुट इंडेक्स नोव्हेंबरमध्ये किंचित वाढून ५६.३ अंकांवर पोहोचला. ऑक्टोबरमध्ये तो ५६.२ अंकांवर होता.

आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत किंचित वाढ झाली. मात्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी जवळपास एका वर्षानंतर प्रथमच कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली. त्याचवेळी उत्पादन खर्चातील वाढ मर्यादित राहिली असून, व्यावसायिकांचा भविष्यातील आर्थिक परिस्थितीबाबतचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे. मे महिन्यानंतर प्रथमच सकारात्मक व्यावसायिक दृष्टिकोन सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

हे ही वाचा:

‘नो हँडशेक’वर एमसीसीचे हात बांधलेले!

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

पाकिस्तानकडून पराभव, आता यूएईविरुद्ध ‘करो वा मरो’!

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

एचएसबीसीच्या मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सांगितले की, नव्या ऑर्डर्समधील वाढीमागे मजबूत देशांतर्गत मागणी हे प्रमुख कारण होते. मात्र, नव्या निर्यात ऑर्डर्समध्ये काहीशी नरमाई दिसून आली. याउलट, नव्या निर्यात व्यवसायात मोठी वाढ होऊनही सेवा क्षेत्राची कामगिरी काहीशी कमकुवत राहिली. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीतील महागाई मर्यादित राहिली, तर विक्री किमतींमध्ये किरकोळ वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्याच्या प्रमाणाला आधार मिळाला.

नोव्हेंबरमध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादन आणि व्यावसायिक कामकाजातील वाढीमागे एकूण नव्या व्यवसायांमध्ये झालेली वाढ महत्त्वाची ठरली. जून महिन्यानंतर प्रथमच नव्या व्यवसायांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढ नोंदवण्यात आली. सेवा क्षेत्रातील मागणी वाढीचा वेग स्थिर राहिला, तर उत्पादन क्षेत्रातील मागणीत वेगाने वाढ झाली. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांनी बाजारातील अनुकूल मागणी आणि नव्या ग्राहकांची भर पडल्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version