घरराजकारणखरं काय? संस्था भाजप-आरएसएसच्या ताब्यात, २०० अधिकारी मात्र राहुल गांधींच्या संपर्कात

खरं काय? संस्था भाजप-आरएसएसच्या ताब्यात, २०० अधिकारी मात्र राहुल गांधींच्या संपर्कात

राहुल गांधींचे पत्रकार परिषदेत नवे दावे

विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देशातील सर्व संस्था या भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ताब्यात आहेत, असा दावा करत असतात. मात्र त्याच संस्थांमधील २०० अधिकारी आपल्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे यातले नेमके खरे काय, असा सवाल विचारला जात आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीतील सदस्यांचा मोर्चा काढण्यात आला. त्याआधी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारमधील अधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावा छातीठोकपणे केला. केंद्र सरकारमधील २०० अधिकारी आपल्या संपर्कात आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि परराष्ट्र मंत्रालयासह विविध विभागांतील अधिकारी आपल्या संपर्कात असून आपल्याला सगळी माहिती ते देत असतात, असे राहुल गांधी म्हणाले. 

एवढेच नव्हे तर ज्या ज्ञानेशकुमार यांच्यावर राहुल गांधी यांचा आरोप आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, तेदेखील राहुल गांधींच्या संपर्कात असल्याचा त्यांचा दावा आहे. ज्ञानेश कुमार आपल्याला मेसेज पाठवतात असा दावा करत राहुल गांधी म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन माफीचे साक्षीदार व्हावे. तुम्ही चूक केली आहे; पण तुम्ही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नाही.

पत्रकारांनी ज्ञानेश कुमार यांच्याकडून काही संदेश मिळाले आहेत का, असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी होकारार्थी उत्तर दिले. “माझे उत्तर त्यांना एवढेच आहे—माफीचे साक्षीदार व्हा. राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. देशासाठी ही सेवा ठरेल. तुम्ही कोणत्या दबावाखाली आहात, हे आम्हाला समजते.

हे ही वाचा:

एमपीएससी चौकशीसाठी समिती; तुकाराम मुंढेंकडे महत्त्वाची जबाबदारी

“लोकशाहीला सचोटीची गरज, निवडक संतापाची नाही”

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

खैबर पख्तूनख्वामध्ये आणीबाणी; इम्रान यांच्या पक्षाचे नेते अटकेत

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची तुलना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भगवान शंकराच्या तांडवाशी केली आहे. या आंदोलनासाठी कोणताही ठरावीक आराखडा किंवा नियोजन आवश्यक नसून, आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपात काही दिवस किंवा अनेक वर्षे सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी इंडी आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयाकडे जाणाऱ्या मोर्चापूर्वी काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version