घरराजकारणमॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बुधवारी (११ नोव्हेंबर) अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. सकाळी नियमित मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनखड काही मिनिटे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करत त्यांना पोलिसांच्या पीसीआर वाहनातून त्यांच्या निवासस्थानी आणले.

धनखड यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर इंडियन लिव्हर अँड बायलरी सायन्सेस (ILBS) रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तसेच एम्सचे डॉक्टर संदीप सेठ यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. मात्र, त्यांची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णवाहिकेतून एम्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांना एम्सच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, हृदयरोग विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

वैदिक मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला; एका भारतीय नागरिकासह चार खलाशी जखमी
धनखड यांचे वय ७५ वर्षे असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर वैद्यकीय माहिती समोर आलेली नाही. तसेच त्यांना नेमका कोणत्या कारणामुळे चक्कर आली किंवा ते बेशुद्ध का पडले, याबाबतही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. एम्स प्रशासनाकडूनही अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, धनखड यांना यापूर्वीही आरोग्याच्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च २०२५ मध्ये चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे या तक्रारींमुळे त्यांना ९ ते १२ मार्चदरम्यान एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या हृदयावर स्टेंट बसविण्याची प्रक्रिया केली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव जुलै २०२५ मध्ये त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या समर्थकांकडून आणि राजकीय नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version