घरराजकारणराज्यपाल कोश्यारी म्हणतात, मनन-चिंतन करायचे आहे, आता जबाबदारीतून मुक्त करा!

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, मनन-चिंतन करायचे आहे, आता जबाबदारीतून मुक्त करा!

पंतप्रधानांना पत्र पाठवून व्यक्त केली इच्छा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला जबदारीतून मुक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे, असे वृत्त आहे. यासंदर्भात राजभवन कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

मौलाना रशिदीने गरळ ओकली; म्हणे सोमनाथ मंदिरात गैरव्यवहार होत होते म्हणून ते तोडले

अख्ख्या पाकिस्तानची बत्ती गुल!

युती टिकवायचे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही

सरसंघचालक म्हणाले,नेताजींची स्वप्ने अजून अपूर्ण

वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकारासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version