घरराजकारणजगाला शांततेचा मार्ग भारतच दाखवू शकतो

जगाला शांततेचा मार्ग भारतच दाखवू शकतो

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन असे कर

मुंबईत आयोजित अखिल भारतीय विहार सेवा समूहाच्या १४व्या वार्षिक अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जगासमोरील वाढत्या संघर्षांवर भाष्य करत भारताच्या ज्ञानपरंपरेची भूमिका अधोरेखित केली. सध्या जग विकास आणि पर्यावरण संरक्षण, व्यक्तिस्वातंत्र्य आणि कौटुंबिक जीवन तसेच धार्मिक श्रद्धा आणि संघर्ष अशा अनेक परस्परविरोधी प्रश्नांमध्ये अडकले आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर शोधताना दुसरी समस्या निर्माण होत असल्याने संतुलनाचा अभाव आणि अतिवाद वाढत असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर जगाला पुढचा मार्ग भारताकडून मिळू शकतो, असे भागवत यांनी सांगितले. भारताने दीर्घ काळ कोणत्याही देशावर विजय मिळवण्याचा किंवा धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न न करता आपली ज्ञानपरंपरा जगासमोर मांडली, असा दावा त्यांनी केला. भारताच्या वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भगवद्गीता, जैन आगम, त्रिपिटक, गुरु ग्रंथ साहिब आणि संतांच्या शिकवणीमध्ये मोठा ज्ञानसाठा असून, आजच्या जगाला या परंपरेतील विचारांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
जन्मदिनी लवलीनाचा सुवर्ण पंच!

कोरियाचा गड भेदत भारताचा सुवर्णवेध!

“हिंदुस्तानी जीव घेणारे नाही, जीव वाचवणारे”

एचडीएफसी बँकेच्या नव्या सीईओची घोषणा

भारताच्या संदर्भात धर्म आणि राष्ट्र हे एकमेकांपासून वेगळे नसल्याचेही भागवत यांनी सांगितले. राष्ट्राची भूमिका आणि धर्माची मूल्यव्यवस्था परस्परांशी जोडलेली असून, दोन्हींचे संतुलन राखणे ही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा जपणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे संरक्षण करणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून मानवतेच्या भविष्यासाठीची सेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. समर्पण एखाद्या उदात्त आणि व्यापक उद्देशासाठी असेल, तर ते व्यक्तीच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवते, असेही भागवत यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version