घरराजकारणदहशतवाद्यांना कण्ठस्नान घालणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी

दहशतवाद्यांना कण्ठस्नान घालणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी

गोरेगाव येथील सभेत बोलत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात दहशतवाद्यांना कण्ठस्नानं घालणारा हिंदू हवाय, तर तो हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर करण्यात आलेल्या टीकेवरूनही फडणवीसांनी ठाकरेंना धारेवर धरले.

बाळासाहेब ठाकरे हे शेर होते पण आता या देशात एकच शेर आहे. त्याचे नाव नरेंद्र मोदी. हा मोदीजींचा हिंदुस्तान आहे. तुम्ही म्हणता दहशतवाद्यांना कण्ठस्नानं घालणारा हिंदू हवाय, तर तो हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मारणार हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी. जेव्हा एक काश्मिरी मारला जातो त्या बदल्यात तीन दहशतवादी मारले जातात. पण तुम्ही शार्जील उस्मानीचे काय केलेत? असा सवाल फडणवीसांनी केला. शार्जील उस्मानीला पकडून आणणार होतात. भाषा तर केलेली की तो शार्जील ज्या राज्यात आहे तिथून त्याला खेचून आणू. पण त्या शर्जीलाच श पण नाही आला.

हे ही वाचा:

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

तर उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे सोनिया गांधींसाठी होते असा टोला फडणवीसांनी ;लगावला आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण सोनियाजींना समर्पित होते. म्हणून त्यांनी राष्ट्र स्वयंसेवक संघावर टीका केली. ते काँग्रेसची भाषा बोलत होते. खरंतर डॉक्टर खेडेगावार यांचे नाव क्रांतिकारकांच्या यादीत येते. ते स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठी, जंगल सत्याग्रहासाठी जेलमध्ये होते. पण उद्धव ठाकरेंना हे माहित नसेल. पण काँग्रेसला दाखवायला की “मी हिंदुत्वावर बोल्लोय पण संघावरही टीका केल्ये.” असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आसूड ओढला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version