घरराजकारणएक पाऊल पुढे टाका, भाजपा हाच एकमेव पर्याय आहे

एक पाऊल पुढे टाका, भाजपा हाच एकमेव पर्याय आहे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता महाविकास आघाडीतील आमदारांभोवती जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे. येणारा धोका समजा, एक पाऊल पुढे टाका, भाजपा हाच एकमेव पर्याय आहे, असं भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये प्रवेश करण्याचं आवतनच आघाडीच्या आमदारांना दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करून हे आमंत्रण दिलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीमधे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सगळे गल्लोगल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. महाविकास आघाडीमधल्या आमदारांना हा संदेश आहे, येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे, असं ट्विट राणे यांनी केलं आहे. राणे यांनी या ट्विटमधून आघाडीच्या आमदारांना थेट भाजपा प्रवेशाची ऑफरच दिली आहे.

आतापर्यंत मतमोजणीच्या ३० फेऱ्यांपेक्षा जास्त फेऱ्या झाल्या आहेत. सर्व फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार समाधाव आवताडे आघाडीवर दिसत आहेत. सध्याची परिस्थितीत बघता समाधान आवताडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय. भाजपा नेते प्रशांत पारिचारक यांच्या घरी कार्यकर्ते जमले आहेत. तिथे समाधान अवताडे देखील आहेत. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाल देखील उधळला आहे. विजयाची औपचारिक घोषणा होण्याआधी आम्ही समाधान आवताडे यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित असून औपचारिक घोषणेची वाट बघत असल्याचं सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version