घरक्राईमनामाआता पूजा चव्हाणच्या नातेवाईकही संजय राठोड विरोधात तक्रार दाखल करणार

आता पूजा चव्हाणच्या नातेवाईकही संजय राठोड विरोधात तक्रार दाखल करणार

- Advertisement -

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड या पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. याशिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही कळत आहे. विशेष म्हणजे शांताबाई राठोड त्यांच्या तक्रारीमध्ये वनमंत्री संजय राठोड याचेसुद्धा नाव घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करणार आहेत.

हे ही वाचा:

पूजा चव्हाणच्या नातेवाईकाकडून सीबीआय चौकशीची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड याचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. संजय राठोड याच्या राजीनाम्याच्या मागणीने आता चांगलाच जोर पकडला आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरसुद्धा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे सावट आल्याचे दिसत आहे. राठोडचा राजीनामा घेत नाहीत तोर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड याचा राजीनामा घेणार असल्याचे बोलले जात आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात यापूर्वी भाजपाने पुण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पूजा चव्हाणच्या कुटुंबाशी थेट संबंध असणारी व्यक्ती म्हणजेच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड या पूजाच्या मृत्यूबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी समोर आल्या आहेत. याशिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version