घरराजकारणसोमवारी काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा

सोमवारी काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर काँग्रेसला आता दिल्लीत आंदोलन करण्याची इच्छा झाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आम्ही चाल करून येत आहोत, घाबरू नका, असे आवाहन तरुणांना केले आहे. देशातील लोकशाहीबाबत चिंता वाटणाऱ्या नागरिकांनी कथित देशव्यापी ‘व्होट चोरी’विरोधात सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी केले.

या मोर्चात ‘इंडिया’ आघाडीचे खासदार, विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. तसेच, आघाडीचे वरिष्ठ नेते भारताचे सरन्यायाधीश यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. कथित निवडणूक गैरप्रकारांच्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी यांनी गेले तीन दिवस आंदोलने केली. आकाशवाणी भवनात ते ठिय्या धरून बसले होते. पण संध्याकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. सध्या या माध्यमातून ते अधिकाधिक प्रकाशात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेचा ‘स्वच्छता रथ’ धावला; १.६८ लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट

विश्वचषकासाठी रोहित-विराटचा फॉर्म निर्णायक!

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा प्राइस बँड निश्चित!

अमेरिकेचे व्हिसा निर्बंध भारतासाठी सुवर्णसंधी

राहुल गांधी यांनी व्हीडिओ बनवून म्हटले आहे की, गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मी नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात लढा देत आहे. सर्व बाजूंनी त्यांच्याभोवतीचा फास आवळला जात आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुम्हाला हवे तितके पोलीस बळ तैनात करा. १०,०००, २०,००० किंवा ५०,०००, हवे तितके पोलीस बोलवा. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा. घाबरू नका. आम्ही सर्व बाजूंनी तुमच्यावर चाल करून येत आहोत आणि आम्ही माघार घेणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version