घरक्राईमनामादेवाच्या काठीला आवाज नसतो

देवाच्या काठीला आवाज नसतो

शालिनीताई पाटलांचा अजित पवारांवर हल्ला

अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला. “देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर दिली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याच्या ईडीवरील कारवाईनंतर शालिनीताईंनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का असल्याचं समजलं जात आहे. ईडीने ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आली.

या कारवाईवर माजी आमदार शालिनीताई पाटील म्हणाल्या की, “आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ ३ कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक पाहता आमच्या खात्यात ८ कोटी रुपये होते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला. त्यांनी २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. परंतु थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला. आम्ही चार जणांनी अर्ज केला होता. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी एफआयआर दाखल करुन ईडीने घेतली होती. त्यांनी मान्य केलं होतं की भ्रष्टाचार झाला होता. मला आनंद आहे २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे. लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला एकदा सोडला तर कधीच निवडणूक कारखान्यात झाली नव्हती.

हे ही वाचा:

अमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

“कोर्ट माझ्यापाठी पहिल्यापासून लागलं होतं. कारण यांनी माझी कामं कधी होऊ दिली नाहीत. त्यामुळे मला सुप्रीम कोर्टाची मदत घ्यावी लागली होती. मी सत्यमेव जयतेवर विश्वास ठेवते,” असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version