घरक्राईमनामास्पेशल २६’ स्टाईल बनावट आयकर धाड

स्पेशल २६’ स्टाईल बनावट आयकर धाड

६ जणांना अटक तीन फरार

- Advertisement -

‘स्पेशल २६’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आयकर आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी बनून ९ जणांनी एका अंधेरी येथील एका नामांकित वैद्यकीय उपकरणे विक्रेत्याच्या कार्यालयावर धाड टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान या ‘स्पेशल २६’ टोळीने व्यावसायिकाचे आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करून, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. त्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या ६ पुरुष आणि ३ महिला अशा एकूण ९ अज्ञात भामट्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

संतोष उदय खोपटकर (३७),प्रेम सबनानी (५०), प्रज्ञा माईन (२७),रेश्मा वारंग(४१),सबिना शेख (४८),विनय रमेश मोरे (३७) असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे.अटक करण्यात आलेल्यापैकी तिघे जण सराईत असून त्यांच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे दाखल असून अटक महिलापैकी एक जण इस्टेट एजंट तर दोघी ब्युटीशीयन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

दहिहंडीच्या दोरामुळे भिंतीचा कॉलम कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

बोरिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रमुख जनसंवाद कार्यक्रम

केरळमधल्या भीषण अपघातात तमिळनाडूतील ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

जंतर मंतर हल्लाप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला एक दिवसाची कोठडी

तक्रारदार राजकुमार कन्डासमी (४९) यांचा चकाला येथील सहार कार्गो इस्टेटमध्ये ‘टु एम ऑप्थोट्रॉनिक्स प्रा. लि.’ हा वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय आहे. १७ जुलै रोजी सायंकाळी कार्यालयातून घरी गेल्यानंतर कर्मचाऱ्याने फोन करून आयकर विभागाची धाड पडल्याचे सांगितले. सर्वांचे मोबाइल जप्त करून सीसीटीव्ही बंद केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर एका भामट्याने कन्डासमी यांना कार्यालयात येण्याची धमकी दिली.

पत्नीसमवेत कार्यालयाकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या तोतया अधिकाऱ्यांनी दोघांना अडवून बनावट ओळखपत्र दाखवले आणि टॅक्सीत बसवून कार्यालयात नेले. तेथे पाच पुरुष व तीन महिला आधीपासून उपस्थित होते. त्यांनी आयकर आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट सर्च वॉरंटवर कन्डासमी यांची स्वाक्षरी घेतली.

रोखीच्या व्यवहारांचा मुद्दा उपस्थित करून १ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड होईल, अशी धमकी देण्यात आली. कारवाई टाळण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. सुमारे तीन तास दहशत माजवल्यानंतर आरोपी पसार झाले. खातरजमा केल्यानंतर धाड बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने कन्डासमी यांनी पोलिसांत धाव घेतली. BNS अंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version