राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बोरिवली भागातर्फे प्रमुख जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘१०० वर्ष की संघ यात्रा – नए क्षितिज’ या कार्यक्रमातून संघप्रवासाचा विचार मांडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सह संघचालक डॉ. विष्णूजी वझे यांचे व्याख्यान पहिल्या सत्रात होईल तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांचे दुसऱ्या सत्रात व्याख्यान होईल. समाजात विविध क्षेत्रात वावरणाऱ्या सन्मानित व्यक्तींना या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा विचार आहे.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये पुन्हा चमत्कार! १० दिवसांनी बोगद्यातून चिनी कामगार जिवंत बाहेर
दहिहंडीच्या दोरामुळे भिंतीचा कॉलम कोसळून चिमुरड्याचा मृत्यू
जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये लष्करच्या कमांडरचा खात्मा
रविवारी ६ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून टॉवर डी, बँकेट हॉल, चौथा मजला, ओबेरॉय स्काय सिटी, बोरिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होत आहे.
भारताची सनातन सांस्कृतिक चेतना, सामाजिक समरसता व राष्ट्र जीवनाची अखंड परंपरा याच्या संवर्धनार्थ समाजातील विवेकी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी अशी विनंती बोरिवली भाग संघचालक केतन मेर यांनी केली आहे. यासंदर्भात विजय मांडवगडे 9004582001, सुनील राठी 9322917171 यांच्याशी संपर्क साधावा.
