घरदेश दुनियानेपाळमध्ये पुन्हा चमत्कार! १० दिवसांनी बोगद्यातून चिनी कामगार जिवंत बाहेर

नेपाळमध्ये पुन्हा चमत्कार! १० दिवसांनी बोगद्यातून चिनी कामगार जिवंत बाहेर

प्रकृती स्थिर असल्याची माहिती

- Advertisement -

नेपाळमध्ये भीषण महापुरानंतर सुरू असलेल्या बचावकार्यात आणखी एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. पूरग्रस्त भागातील अपर त्रिशूली-१ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तब्बल १० दिवस अडकून पडलेल्या एका चिनी नागरिकाची जिवंत सुटका करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरामुळे हा कामगार बोगद्यात अडकला होता. शनिवारी बचाव पथकाने त्याला सुरक्षित बाहेर काढले. या कामगाराची ओळख लू हैताओ अशी करण्यात आली आहे. तो २२५ मीटर लांबीच्या बोगद्यात अडकून होता.

बचावानंतर लू हैताओ याला वैद्यकीय तपासणीसाठी हेलिकॉप्टरने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला सौम्य हायपोथर्मियाचा त्रास झाला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यापूर्वी शुक्रवारी त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात नऊ दिवस अडकून पडलेल्या दोन नेपाळी कामगारांची जिवंत सुटका करण्यात आली होती. यांत्रिक फोरमन संजय शाह आणि यांत्रिक पर्यवेक्षक कबीर महार्जन अशी त्यांची नावे आहेत. संजय शाह यांनी बचावल्यानंतर बोगद्याच्या आत आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली होती. बचाव पथकांना बोगद्यातून आवाज ऐकू आल्यानंतर शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मुंबई उच्च न्यायालयाचा ‘ओल्ड मॉन्क’च्या लेबलवर आक्षेप

समाजवादी पक्षाचा पदाधिकारी रस्त्यावरच पढत होता नमाज, एफआयआर दाखल

जंतर मंतर हल्लाप्रकरणी स्वतंत्र भारद्वाजला एक दिवसाची कोठडी

शिक्षकदिनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधानांची मनमोकळी ‘बात’

नेपाळमधील या विनाशकारी पुरात आतापर्यंत १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. त्रिशूली नदी परिसरातील अनेक जलविद्युत प्रकल्पांना मोठा फटका बसला असून, विविध बोगद्यांमध्ये अजूनही शेकडो कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळी लष्कर आणि बचाव पथकांना भारत, चीन, दक्षिण कोरिया आणि इतर देशांतील तज्ज्ञांचे सहकार्य मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version