ऍड. गौरी भिडे यांचे वडील अभय भिडे यांचे दीर्घ आजारामुळे शनिवारी निधन झाले. ते ७६वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम, पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यंतरीच गौरी भिडे यांनी त्यांच्यावरील उपचारासाठी मदतीचे आवाहन केले होते. लोकांनीही मदतीचा हात दिला होता. पण त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ही वाचा:
शाजापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत हिंसक संघर्ष
न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध जुरेल, सुंदरची अर्धशतके
इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. न्यूमोनियामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून ते बरे होऊन घरी परतले. मात्र पुन्हा एकदा त्यांना आजाराने गाठले. त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत. मात्र या उपचारासाठी त्यांना आयुषमान कार्डने मोठा आधार दिला. गौरी भिडे यांनी यासंदर्भात सांगितले की, या कार्डमुळे त्यांच्या उपचारासाठी खर्च करावा लागला नाही.
ते पेशाने प्रिंटर होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रेस त्यांच्या मालकीची होती. बालभारतीच्या पुस्तकांचे प्रिटिंग हे त्या प्रेसमध्ये होत असे. हसतमुख असा स्वभाव असलेले अभय भिडे यांचे वाचन दांडगे होते. विविध विषयांवर त्यांची उत्तम पकड होती.
