घरदेश दुनियाअमेरिकेत निवडणुकीतील पराभवाचा राग भारतीयांवर

अमेरिकेत निवडणुकीतील पराभवाचा राग भारतीयांवर

दिवाळी कार्यक्रमात हिंदूविरोधी घोषणाबाजी

अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच त्याचे पडसाद भारतीय समुदायावर उमटल्याचा प्रकार समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी निवडणुकीतील पराभवाचा राग भारतीयांवर काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमेरिकेतील सिएटल येथे आयोजित दिवाळी कार्यक्रमात दोन आंदोलकांनी हिंदूविरोधी आणि भारतीयांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या दिवाळी उत्सवात अशा प्रकारचा हस्तक्षेप झाल्याने भारतीय समुदायातून संताप व्यक्त केला जात आहे.

सिएटलमधील सिएटल सेंटर आर्मरी येथे हा प्रकार घडला. जॅक लँग आणि थॉमस ॲलन हे दोन आंदोलक अमेरिकेचे राष्ट्रध्वज घेऊन कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांच्या हातातील फलकांवर भारतीयांना अमेरिकेतून हाकलून देण्याची आणि हिंदू धर्माविरोधात आक्षेपार्ह संदेश लिहिले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी कार्यक्रमात लहान मुले सांस्कृतिक नृत्य आणि विविध कलांचे सादरीकरण करत होती. या वातावरणात आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, उपस्थितांनी विरोध केल्यानंतर त्यांना कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची तारीख अजितदादांनीच सांगितली होती

शाजापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत हिंसक संघर्ष

२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे २० शिलेदार शॉर्टलिस्ट!

प्रदूषणाचे कारण… पंजाबमध्ये ३,३०७ पराली जाळल्या

या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील भारतीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेस सदस्या प्रमिला जयपाल यांनी या प्रकाराचा निषेध केला. हिंदू समुदायाला कोणत्याही भीतीशिवाय आपले धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरे करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्णद्वेष आणि धार्मिक द्वेषाला अमेरिकेत स्थान नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, उत्तर अमेरिकेतील हिंदूंची संघटना असलेल्या कोअ‍ॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका अर्थात कोहना या संघटनेने सिएटल आणि आसपासच्या परिसरातील हिंदूंना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी दिवाळी कार्यक्रमांमध्येही अशा प्रकारचे अडथळे निर्माण होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. अमेरिकेत भारतीय समुदायाची वाढती उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक सलोखा आणि समुदायाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version