घरविशेषशाजापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत हिंसक संघर्ष

शाजापूरमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटांत हिंसक संघर्ष

२० जण जखमी

मध्य प्रदेशातील शाजापूर येथे स्मशानभूमीच्या जमिनीच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. जमिनीच्या हक्कावरून सुरू झालेल्या वादात दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संघर्षात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरजवळ असलेल्या टपका बसंतपूर गावात रविवारी सकाळी स्मशानभूमीच्या जमिनीवरून दोन गटांमध्ये भीषण संघर्ष झाला. सुमारे पावणेदोन बिघा जमिनीच्या मालकीवरून सुरू असलेल्या जुन्या वादाने अचानक हिंसक वळण घेतले. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक, गोळीबार आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या संघर्षात महिला आणि ९० वर्षांच्या वृद्धासह एकूण २६ जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
आंतरराष्ट्रीय दबावाला वरचढ होऊ दिले नाही!

लिओनेल मेस्सीचा गोल्डन बूटवर पुन्हा कब्जा; इतिहास रचला!

न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध जुरेल, सुंदरची अर्धशतके

फडणवीसांची ती ‘दिवाळी भेट’ अत्यंत हृदयस्पर्शी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एका व्यक्तीला वडिलांच्या कबरीवर प्रार्थना करण्यासाठी स्मशानभूमीत जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला. एका गटातील लोकांनी घराच्या छतावरून दुसऱ्या गटावर दगडफेक केल्याचा आरोप असून, त्यानंतर दुसऱ्या गटातील लोकांनी संबंधित घरात घुसून तोडफोड आणि मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत काठ्या, लोखंडी सळ्या, तलवार आणि कुऱ्हाड यांसारख्या शस्त्रांचा वापर झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाहनांचे नुकसान झाले असून, घरातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली.

या जमिनीवरून शमशाद खान आणि राजू सरफुद्दीन खान यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका गटाचा दावा आहे की, संबंधित जमीन स्मशानभूमीची असून तिच्यावर अनधिकृतपणे कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसऱ्या गटाने जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत.

घटनेनंतर गावातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी एकूण ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. जमिनीच्या मालकीचा वाद नेमका कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट करण्यासाठी महसूल विभागाकडून जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version