घरराजकारणकर्जतचा प्रकल्प सुरतेचा बदला घेण्यासाठी?

कर्जतचा प्रकल्प सुरतेचा बदला घेण्यासाठी?

आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

कर्जत येथे होत असलेल्या पम्प्ड पॉवर प्रोजेक्टची चर्चा सुरू असताना उबाठा शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी सह्याद्रीची का निवड केली, आणखी कुठे हा प्रकल्प होऊ शकला नसता का असा सवाल उपस्थित करत या प्रकल्पाचा शिवाजी महाराज, मावळे, सुरत यांच्याशी संबंध जोडला.

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या प्रकल्पाबद्दल प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सांगावे की सह्याद्रीच का निवडला. हीच जागा का सरकारला पाहिजे. गुजरातच्या कंपनीला का हा प्रकल्प दिला. ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये शिवछत्रपती आणि मावळे लहानाचे मोठे झाले, त्याच दऱ्याखोऱ्या पोखरायच्या आहेत का, गुजरात्यांना कंत्राट का द्यायचे आहे? स्थानिकांना तिथून हाकलून लावायचे आहे का?

 

देखभाल, बटण दाबण्यापुरत्याच नोकऱ्या

आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पातून मिळणाऱ्या नोकऱ्यांबद्दलही प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, या प्रकल्पातून ५०-६० नोकऱ्याच मिळतील. ते म्हणाले की, या प्रकल्पातून हजारो नोकऱ्यांची निर्मिती होणार असा दावा केला जातो. खरे तर खेचून खेचून ५०-६० नोकऱ्या निर्माण होतील. इथे फक्त देखभाल आणि बटण दाबण्यासाठी नोकऱ्या मिळतील. फक्त २-४ लोकांसाठी. प्रकल्प बांधून झाल्यावर त्यातल्या नोकऱ्याही कायम राहणार नाहीत.

आपल्य़ाला या प्रकल्पाची माहिती द्यावी असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच जबाबदारी टाकली. तुम्ही कुठे जंगल निर्माण केले आहे ते दाखवा. जनसुनावणी झाली त्याचे आकडे सांगा. त्याशिवाय, आणखी कुठे हा प्रकल्प करता आला असता हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आम्हाला कळल पाहिजे. झाडं लावणार अशी आश्वासनं दिली, ती कुठे लावली ते दाखवा. माझे आव्हान आहे की मुख्यमंत्री, मी आणि मीडिया त्याच साईटवर जाऊ आणि बघू.

आदित्य ठाकरेंनी अशी भीतीही व्यक्त केली की,  कर्जतमधये दुष्काळ आणायचा आहे का. जर तिथे दुष्काळ आला तर त्याला फडणवीस जबाबदार. या ठिकाणी कदाचित बॉर्डेर सिक्युरीटी फोर्सला आणून स्थानिकांना अटक केली जाईल.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काल मला भाजपाचे पदाधिकारी भेटले. जे होतंय ते आम्हाला मान्य नाही, असं त्यांनाही वाटतंय.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version