घरविशेषतामिळनाडूमध्ये दारू खरेदीच्या नियमांत मोठा बदल

तामिळनाडूमध्ये दारू खरेदीच्या नियमांत मोठा बदल

हजार रुपयांवरील बिलासाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य

तामिळनाडूमध्ये मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या टास्मॅक (TASMAC) मद्यविक्री केंद्रांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केल्यास डिजिटल पेमेंट करणे अनिवार्य होणार आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, ग्राहकांना यूपीआय, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरता येतील. एक हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी मात्र रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

मद्यविक्रीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे, आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालणे आणि ग्राहकांकडून बाटलीवरील छापील किमतीपेक्षा अधिक पैसे आकारण्याच्या तक्रारींवर नियंत्रण मिळवणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. तामिळनाडूमधील टास्मॅकच्या मद्यविक्री केंद्रांमध्ये रोख रकमेच्या व्यवहारांदरम्यान हिशेबातील तफावत आणि अतिरिक्त पैसे आकारण्यासंबंधीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे प्रत्येक खरेदीची अधिकृत नोंद उपलब्ध होणार असून, ग्राहकांनी भरलेल्या रकमेची पडताळणी करणेही सोपे होणार आहे.
हे ही वाचा:
एसआयआरनंतर कर्नाटकच्या मतदार यादीतून ९९ लाख नावे वगळली

कॅनडा ओपनमध्ये अनाहत उपांत्यपूर्व फेरीत

शेतकऱ्यांकडून सक्तीने हप्ते वसूल केल्यास कठोर कारवाई

अभिषेकच्या वादळात न्यूझीलंड भुईसपाट!

नव्या व्यवस्थेनुसार, डिजिटल पेमेंट अधिकृत बँक खात्याशी जोडलेल्या पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीनद्वारेच स्वीकारावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक यूपीआय क्यूआर कोड किंवा बँक खात्यावर पैसे स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकांना पावती देणे आवश्यक असेल. तसेच मद्याच्या छापील किमतीपेक्षा अधिक पैसे आकारल्यास ग्राहकांना तक्रार करता येणार आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२७ पासून पाचशे रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मद्यखरेदीसाठीही डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात मद्यविक्री केंद्रांमधील रोख व्यवहार आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची फसवणूक रोखण्यास आणि मद्यविक्री व्यवस्थेत आर्थिक पारदर्शकता वाढवण्यास कितपत यश मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version