पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणात वावरत असताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क स्थापित करतात. आंतरराष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोडा यांना मोदींनी गुरुवारी दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी मोदींचा कर्नाटक दौरा होता, त्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत काही हलकेफुलके क्षण चर्चेत राहिले. एकीकडे राहुल गांधी मोदींवर फोन टॅप केल्याचे आरोप करत असताना मोदींनी काँग्रेसच्या या नेत्यांशी साधलेली जवळीक राहुल गांधींना धक्का देणारी ठरली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सॅम पित्रोडा यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. त्यात नरेंद्र मोदी कसे फर्डे वक्ते आहेत, ते माझे गुजराती मित्र आहेत. मी आणि माझी पत्नी मोदींना भेटलो आहोत. त्यांनी माझी अत्यंत उत्तम विचारपूस केली. आमचे वैयक्तिक कोणतेही वैरभाव नाहीत. माझे हितचिंतकही आहेत ते. मी गुजरातमधील त्यांच्या घरीही गेलेलो आहे. आमच्यात विचाराधारेच्या बाबतीत मतभेद असतील. त्यांच्याशी मतभेद असले तरी त्यांच्यासोबत मी जेवणही घेऊ शकतो, आम्ही एकत्र हास्यविनोदही करू शकतो, असे विधान केले होते.
हे ही वाचा:
रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक
यंदाच्या दिवाळीत काजू कतलीचीच धूम
५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा
रोहित, विराट, अय्यर पहिल्याच षटकात शून्यावर बाद
मोदींनी त्यांचा हा व्हीडिओ शेअर करत सॅम भाई आपल्याला आणि अंजना बेन (पित्रोडांच्या पत्नी) यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा असे म्हणत पोस्ट केली. मोदींच्या या पोस्टची खूप चर्चा झाली. त्यात मिहिर झा नावाच्या एकाने आपल्याला मात्र मोदींनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असे म्हटल्यावर मोदींनी त्यालाही मिहीर भाई तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा, असे म्हणत प्रतिसाद दिला. त्यावरही सोशल मीडियात खूप चर्चा झाली.
सॅम पित्रोडा हे राहुल गांधींच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचे व्यवस्थापन पाहतात, त्यामुळे त्यांना मोदींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मोदींच्या मोठेपणाचे कौतुक केले जात आहे.
शुक्रवारी मोदी कर्नाटक दौऱ्यावर असताना हजारो कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. तिथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. मेट्रोचे उद्घाटन करताना शिवकुमार यांना हलकेच जवळ ओढत त्यांच्या हाती हिरवा झेंडा दिला. त्याशिवाय, भाषणादरम्यान हास्यविनोदही केले. एकीकडे काँग्रेसच्या दिल्लीतील मोर्चात याच शिवकुमार यांना राहुल गांधींसोबत जाताना धक्के खावे लागले, राहुल गांधीही त्यांना कॉलरला धरून मागे ओढत होते, इथे मात्र मोदींनी शिवकुमार यांच्याशी दाखवलेल्या वागणुकीचे सर्वांनी कौतुक केले.
राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्ती मानले गेलेले सॅम पित्रोडा किंवा शिवकुमार यांच्यासंदर्भात मोदींच्या संवादाची सोशल मीडियात बरीच चर्चा झाली. या माध्यमातून राहुल गांधींना धक्का देण्याचा मोदींचा प्रयत्न होता का, अशीही चर्चा केली गेली.
