घरबिजनेसयंदाच्या दिवाळीत काजू कतलीचीच धूम

यंदाच्या दिवाळीत काजू कतलीचीच धूम

ऑनलाइन फूड ऑर्डरमध्ये १०.७ टक्क्यांची वाढ

दिवाळी म्हटलं की मिठाई, फराळ आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आलीच! यंदाच्या दिवाळीत भारतीयांच्या ताटात नेमकं काय होतं, याचा रंजक खुलासा स्विगीच्या आकडेवारीतून झाला आहे. काजू कतलीने मिठाईच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं असून मसाला डोसा आणि पनीर बटर मसाल्यालाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली. मोतीचूर लाडू, रसगुल्ला आणि गुलाबजाम यांचीही मागणी कायम राहिली. बंगळुरू, मुंबई, दिल्ली, जयपूर आणि हैदराबादमध्ये काजू कतलीची विशेष क्रेझ पाहायला मिळाली.

दिवाळीच्या काळात ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्येही लक्षणीय वाढ झाली. ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान स्विगीच्या फूड डिलिव्हरी ऑर्डरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १०.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या काळात दर तासाला सरासरी ९७ हजार ५४५ ऑर्डर वितरित करण्यात आल्या. म्हणजेच, जवळपास प्रत्येक तासाला एक लाख खाद्यपदार्थ ग्राहकांच्या दारात पोहोचत होते. मिठाईसोबतच मसाला डोसा, पनीर बटर मसाला, समोसा आणि अॅपमसारख्या पदार्थांनाही मागणी होती.
हे ही वाचा:
राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सनी धूळ चारली!

स्कालोनी यांची अर्जेंटिनाच्या प्रशिक्षकपदी २०३० पर्यंत वर्णी

हेन्रीच्या भेदक माऱ्याने भारताचा धुव्वा

दिवाळीच्या खरेदीत काही ग्राहकांनी तर खर्चाचे नवे विक्रमच केले. हैदराबादमधील एका ग्राहकाने ४१ हजार ८९५ रुपयांची मिठाई ऑर्डर केली. तर मुंबईतील एका ग्राहकाने सात मिठाईचे गिफ्ट हॅम्पर्स खरेदी करण्यासाठी ४१ हजार ७७२ रुपये खर्च केले. यावरून सणासुदीच्या काळात मिठाई आणि गिफ्टिंगसाठी ग्राहकांची वाढती खर्च करण्याची तयारी स्पष्ट होते.

विशेष म्हणजे, दिवाळीत केवळ घरपोच खाद्यपदार्थांनाच नव्हे, तर रेस्टॉरंटमधील जेवणालाही पसंती मिळाली. स्विगी डाइनआउटवर दिवाळीच्या दिवशी टेबल बुकिंगमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ३८.५ टक्क्यांची वाढ झाली. मुंबईतील एका ग्राहकाने रेस्टॉरंटमधील जेवणासाठी तब्बल १ लाख ३४ हजार २१० रुपयांचं बिल भरलं. एकूणच, यंदाची दिवाळी मिठाईच्या गोडव्याबरोबरच ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंटमधील वाढत्या खर्चामुळे फूड इंडस्ट्रीसाठीही फायदेशीर ठरल्याचं चित्र आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version