घरराजकारणशरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं

शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं

शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. मात्र, अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं गुरुवारी केलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. शरद पवारांच्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार आमचे आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर तर, आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं काय चाललं आहे असा सवाल आता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना पडू लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा:

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

कार्लसनने वर्ल्डकप जिंकला, प्रज्ञानंदने जिंकली मने

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेल तर त्याचं स्वागत करतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version