घरराजकारणकेतकी चितळेवर शाई आणि अंडीफेक

केतकी चितळेवर शाई आणि अंडीफेक

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनतर राजकीय वर्तुळात तिच्या वक्त्यव्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केतकी चितळे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतल्यानंतर तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेले होते. त्यादरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर शाई व अंडी फेकली.

नवी मुंबई पोलीस केतकीला नेत असताना हा सर्व प्रकार घडला. राष्ट्रवादीचे कार्यकारी यावेळी केतकी विरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. तिच्यावर शाई आणि अंडी फेकण्यात आली आणि तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घोषणाबाजीही केली.

हे ही वाचा:

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

एलोन मस्क यांनी थांबवली ट्विटरची बोली

केतकी चितळे ही तिच्या सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. केतकी चितळे हिने फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक पोस्ट केतकी हिने शेअर केली असून या पोस्टनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. तिने तिच्या पोस्टमधून शरद पवारांवर कवितेच्या माध्यमातून टीका केली होती. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिच्यावर संतापले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version