घरक्राईमनामाकीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार?

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक होणार?

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून आता सातारा पोलिस बंडातात्या यांच्या मठात पोहचले आहेत. बंडातात्या यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली होती तसेच महिलांबाबतचे असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता.

सातारा पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या साताऱ्यातील पिंजर मठात पोलिस पोहोचले असून बंडातात्यांवर काय कारवाई होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु असून त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

पुण्यात मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्री धोरणाविरोधात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यानंतर बंडातात्या यांनी माफी मागितली होती. मात्र, त्यांनी वाईन विक्री धोरणाला विरोध करण्यासाठी केलेले आंदोलन हे परवानगी नसताना केल्याचे समोर आले असून त्यामुळेसुद्धा बंडातात्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात येणाची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version