घरराजकारण"ममतांना ५० हजार पेक्षा जास्त मतांनी हरवले नाही तर राजकारण सोडेन."

“ममतांना ५० हजार पेक्षा जास्त मतांनी हरवले नाही तर राजकारण सोडेन.”

ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुवेंदू अधिकारींनी त्यांना प्रत्यत्तर दिले आहे. “ममता बॅनर्जींना ५० हजार मतांनी निवडणुकीत हरवले नाही तर राजकारण सोडीन.” अशी घोषणा सुवेंदू अधिकारी यांनी केली.

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षातून सुवेंदू अधिकारी यांनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला. सुवेंदू अधिकारी हे मेदिनीपूर भागातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा प्रभाव हा मेदिनीपूर आणि त्या भोवतालच्या ३०-४० विधानसभा मतदार संघांवर आहे. त्यामुळे सुवेंदू अधिकारींच्या भाजपामध्ये जाण्याने ममता बॅनर्जींना मोठा फटका बसला आहे. २०१९ लोकसभेच्या निकालांप्रमाणे पश्चिम बंगालच्या १२२ विधानसभा मतदार संघांवर भाजपा आघाडीवर होती. पश्चिम बंगाल विधानसभेत १४५ हा बहुमताचा आकडा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मेदिनीपूरच्या या जागांवर ममताच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आघाडी होती.

ममता बॅनर्जींवर टीका करताना अधिकारी असे म्हणाले की, “ममतांचा तृणमूल हा पक्ष एका कुटुंबाचा पक्ष झाला आहे. या पक्षात केवळ ममता आणि त्यांचा पुतण्या अभिजीत बॅनर्जी यांचीच मनमानी चालते.”

दरम्यान सुवेंदू अधिकारींच्या रॅलीला जाणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर क्रूड बॉम्ब टाकण्यात आले. ममतांच्या राज्यात बंगालमध्ये राजकीय हिंसाचार गेले अनेक महिने सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version