ब्रिक्स परीषदेची आजपासून नवी दिल्लीत सुरूवात झालेली आहे. भारताकडे या परीषदेचे यजमान पद आहे. आयोजन इतके भारी आहे की एक जर्मन पत्रकार म्हणाला, आम्ही अपेक्षा केली होती, त्याही पेक्षाही भारत जास्त सुदंर आहे. ब्रिक्सचे आय़ोजन दक्षिण आफ्रीका आणि ब्राझीलपेक्षाही भारी आहे. रशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रीका आदी ११ सदस्य देशांचे आणि १० निमंत्रित देशांचे सर्वोच्च नेते दिल्लीत दाखल झाले आहे. ब्रिक्स गट जागतिक जीडीपीमध्ये ४० टक्के योगदान देतो, हे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गटाचे महत्व विषद केले आहे. सोशल मीडियावरही ब्रिक्स फिवर दिसतो आहे. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे फोटो झळकताना दिसतायत. डान्सबारची चर्चा जोरात आहे.
२०२६ या वर्षात मोदी सरकारने देशात दोन आंतरराष्ट्रीय स्तराच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. द इंडीया एआय इम्प्क्ट समिट आणि आता सुरू असलेली ब्रिक्स परीषद. दोन्ही आयोजनांमध्ये भव्यता होती. काँग्रेसच्या दृष्टीने यातले समान सूत्र म्हणजे दोन्ही कार्यक्रमांना त्यांनी गालबोट लावण्याचा प्रय़त्न केला. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न प्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाज आणणे हा त्यांचा उद्देश होता. या प्रयत्नांत आपण देशाची लाज घालवतोय याचे त्यांना भान नव्हते. प्रत्यक्षात यात काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची लायकी पुन्हा देशाला दिसली.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ही संस्कृती आहे. मोदींना अपमानित करण्यासाठी काँग्रेसवाले विवस्त्र व्हायलाही तयार आहेत. ब्रिक्स परीषदेच्या आधी काँग्रेसने हाच खेळ सोशल मीडीयाच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांच्या अंगलट आलेला दिसतो.
हे ही वाचा:
डब्ल्यूसीपीएलमध्ये हरलीनची नवी सुरुवात
ब्रिक्समध्ये भारताची मोठी रणनीती
पश्चिम आशियातील तणावाचा तेलबाजाराला झटका
सोशल मीडियावर ८० च्या दशकातील ट्रेण्ड सुरू झाला. लोकांनी ८० च्या दशकातील जुने फोटो टाकले. लोक या ट्रेण्डची मजा घेत होती. काँग्रेसने यातही शेणगोळे फेकण्याची संधी पाहीली. तेलंगणा काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना किडनॅपर दाखवणारा व्हीडीयो पोस्ट केला. केरळ काँग्रेस मागे कशी राहील? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही असेच व्हीडियो टाकण्याची सुरूवात झाली. मोदींची आंतरराष्ट्रीय फजीती हा एकमेव उद्देश होता. बदनामी फक्त आपणच करू शकतो हा गैरसमज त्यामागे होता.
त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून सोनिया गांधींना बारगर्ल दाखवणाऱ्या पोस्टी सुरू झाल्या. काँग्रेसने हा विषय नारीशक्ती वंदन विधेयक आणि महिलांशी जोडण्याचा प्रय़त्न केला. ज्यांना देशाची बदनामीची चाड नाही, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा जे रोज अपमान करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हयात असताना नसताना, ज्या काँग्रेसवाल्यांनी त्यांची यथेच्छ बदनामी केली, ते आता सोनिया गांधी यांची बदनामी झाल्याचा दावा करून आभाळ हेपलतायत. जेव्हा एखादा विषय पेटतो, तेव्हा सुरूवात कोणी केली या प्रश्नाची चर्चा अवश्यमेव होते. सोनिया गांधी यांच्या इतिहासाची भाजपावाल्यांनी योग्य-अयोग्य पद्धतीने चर्चा केल्यानंतरही हाच प्रश्न उपस्थित होणार आहे की, शेणगोळ्यांचा मारा करण्याची सुरूवात कोणी केली. त्यासाठी ब्रिक्स परीषदेचा मुहुर्त का निवडण्यात आला.
झाले ते चांगले नाही. टीव्हीवरील एका डीबेटची यानिमित्ताने आठवण झाली. या चर्चेच्या दरम्यान जामा मशीदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी अभिनेत्री शबाना आझमी यांना तवायफ म्हणाले होते. खरे खोटे त्यांना आणि शबाना आझमी यांना ठाऊक, परंतु ते जे काही बोलले ते ऐकायला चांगले वाटत नाही. सोनिया गांधींचे वडील मुसोलिनीचे भक्त होते, नाझी फौजेत ते लढले. हा त्यांचा इतिहास आहे. सोनिया यांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर आधी संजय गांधी, नंतर इंदिरा गांधी आणि अखेरीस राजीव गांधी यांचे संशयास्पद मृत्यू झाले. हे घडले नसते तर काँग्रेसचे नेतृत्व एक विदेशी महिलेकडे कधीही आले नसते. याबाबत अनेकदा उलट सुलट चर्चा होताना दिसते. ज्यांच्या स्वत:च्या इतिहासात खंडीभर भानगडी आहेत, त्यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एआयच्या मदतीने गुन्हेगार दाखवण्याचा शहाणपणा दाखवण्याचे कारण नव्हते. सोनिया गांधी यांना बारगर्ल रुपात दाखवण्याची संधी भाजपाला या निमित्ताने मिळाली.
सोनिया गांधी बारमध्ये डान्स करत होत्या की नव्हत्या यात देशातील लोकांना कोणतेही स्वारस्य नाही. एका पक्षाच्या नेत्या म्हणून लोक त्यांना नाकारतात, त्याची कारणे वेगळी आहेत. त्या हिंदू विरोधी आहेत. हिंदुत्वाच्या नावाने त्यांच्या पोटात मुरडा उठतो. यूपीएच्या सत्ताकाळात त्या भ्रष्टाचाराची राणी माशी बनल्या होत्या. त्यांनी देशाची यथेच्छ लूट केली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशहिताच्या प्रत्येक गोष्टीविरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे. मग ते कलम ३७० असो, राम मंदिर, सीएए, जीएसटी, एसआयआर, नारीशक्ती वंदन. यादी खूप मोठी आहे. सोनिया गांधीना दहशतवाद्यांबाबत ममत्व वाटते म्हणून त्यांना विरोध आहे. पाकिस्तानबाबत प्रेम वाटते म्हणून विरोध आहे. देश म्हणजे बापाची मालमत्ता आहे, असे त्यांना वाटते म्हणून विरोध आहे. त्या बारमध्ये डान्स करत असल्या काय नसल्या काय, लोकांना यात फारसा रस नाही. राजीव गांधींना काही हरकत नव्हती तर अन्य कोणाला असण्याचे काहीच कारण नाही.
काँग्रेसवाले दरवेळी अमित शहा यांना तडीपार म्हणतील, मोदींना चायवाला आणि अशिक्षित म्हणतील, वाट्टेल ते खोटे बोलतील आणि भाजपावाले प्रत्येकवेळा संस्कारांचे नाव घेत शांत बसतील हे फार काळ चालणे शक्य नव्हते. कधी तरी काँग्रेसला त्यांच्या भाषेची चव चाखायला मिळणार हे निश्चित होते.
देशात विदेशी पाहुणे येतात तेव्हा मोदी-शहा यांच्या बदनामीला जोर येतो. तेव्हा यावेळी भाजपावाल्यांनीही काँग्रेसवाल्यांना बार दर्शन घडवूनच टाकले. काँग्रेसवाल्यांना जर देशाच्या बदनामीचा कंड सुटला असेल तर त्यांना समजेल अशा भाषेत सांगणे हे भाजपावाल्यांचे कर्तव्य बनते. केवळ काँग्रेसचे चवचाल प्रवक्ते नाहीत, तर काँग्रेसच्या थिंक टॅंकमध्ये असलेले पी.चिदंबरम, जयराम रमेश यांच्यासारखे नेतेही कमरेचे सोडायला तयार आहेत. ब्रिक्सचे आय़ोजन करून भारताचा फायदा काय, असे प्रश्न विचारून चिदंबरम यांनी लुंगी सोडून डोक्याला गुंडाळण्याची मानसिकता दाखवली. यूपीए सरकारच्या काळात ब्रिक्स गटातील एक महत्वपूर्ण देश असलेल्या भारताची अवस्था डळमळीत झाली होती. २०११-१२ मध्ये ब्रिक्स गटाबाबत बोलताना गोल्डमन सॅक्सचे जीम ओ नील म्हणाले होते की, ब्रिक्समधील आय (इंडिया) अगदीच डळमळीत झालेला आहे. ब्रिक्स गटातील देशांमध्ये भारताचा क्रम रशिया, चीन आणि ब्राझील नंतर लागत होता. भारताची जागा इंडोनेशियासारखा देश कधीही घेईल अशी परिस्थिती होती. जगातील पाच सगळ्यात डळमळीत अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे नाव घेतले जात होते. त्या यूपीए सरकारमध्ये बराच काळ अर्थमंत्री पद सांभाळणारे पी.चिदंबरम आज वर तोंड करून ब्रिक्सचे आयोजन करून भारताला फायदा काय, असा कोडगा प्रश्न उपस्थित करतायत. जो भारत आज फ्रॅजिल फाइव्ह नाही तर जगातील पाच अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो.
ज्यांनी अकार्यक्षम कारभाराने भारताला लाज आणली होती, त्यांना जनतेने घरी बसवले. आता देशाची लाज काढण्यासाठी ते कधी कपडे उतरवतात. तर कधी शेणगोळ्यांची फेकाफेक करतात. त्यांच्याबाबत जे काही घडले त्याचा अर्थ एवढाच काचेच्या महालात राहणाऱ्यांना दुसऱ्यावर दगड फेकणे शहाणपणा नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
