घरस्पोर्ट्ससिराजला वगळण्याचा निर्णय कठीणच

सिराजला वगळण्याचा निर्णय कठीणच

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या झुंजार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने भारताचा विजय रोखला. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम अकरामधून वगळण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिले. सिराजला संघाबाहेर ठेवणे आपल्यासाठीही कठीण निर्णय होता, अशी कबुली त्यांनी दिली.

सिराज हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याने भारतासाठी अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. तो माझा जवळचा मित्रही आहे. आम्ही एकत्र क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवणे सोपे नव्हते. मात्र, संघ निवडताना खेळाडूंचा सध्याचा फॉर्म आणि गोलंदाजीतील कामगिरी विचारात घ्यावी लागते, असे गिल यांनी सांगितले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) सध्याच्या चक्रात सिराज भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याला अंतिम अकरामध्ये स्थान न दिल्याने संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर मोठी टीका झाली होती.

याबाबत गिल म्हणाले की, सामन्यापूर्वीच त्यांनी सिराजशी चर्चा करून तो या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सिराजने हा निर्णय समजून घेतला आणि त्यामागील कारणही जाणून घेतले. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असतात. सिराज मेहनत करून पुनरागमन करण्यास तयार आहे. त्याला पुन्हा संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. त्याची ही वृत्ती संघासाठी सकारात्मक असल्याचे गिल यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version