केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पूचक्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मक्केकडव जंक्शन येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयितांची कार अडवून तपासणी केली असता त्यात गांजा आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित कार चेरथला येथून अरुकुट्टीच्या दिशेने जात होती. या कारमधून ११.६ किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांची नावे अली जुवाहर (२४), सलाहुद्दीन अयोबी (२४), कृष्णकुमार (२३), मोहम्मद अस्लम (२३) आणि शमीर (३८) अशी आहेत. हे सर्व जण थायकट्टुस्सेरी येथील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आरोपींनी पलक्कड येथून मोठ्या प्रमाणात गांजा मिळवला होता. त्याची लहान लहान पाकिटांमध्ये विभागणी करून कोची परिसरातील ग्राहकांना विक्री केली जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा:
चीनकडून बांगलादेशला क्षेपणास्त्र निर्मितीचा कच्चा माल?
ना विसावा, ना थांबा… अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा
आशियातील भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यावर शिक्कामोर्तब
गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली
अटक करण्यात आलेला शमीर हा स्थानिक युवक काँग्रेस कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या सोशल मीडिया खात्यांवर काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटोही आहेत. मात्र, जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी तो गेल्या काही महिन्यांपासून संघटनेत सक्रिय नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शमीरला छातीत अस्वस्थता जाणवल्याने त्याला एर्नाकुलम जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पाचही आरोपींविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
