घरविशेषगारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली

गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली

हवेचा गुणवत्ता निर्देशांक २७४ वर

मुंबईत हिवाळ्याची चाहूल लागली असली, तरी शहरावरील प्रदूषणाचे सावट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या तापमानात घट होत असून गार वाऱ्यांमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, सोमवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी दादर समुद्रकिनारा, वांद्रे आणि वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात धुरक्याची दाट चादर पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक भागांतील दृश्यमानता कमी झाली. आकडेवारीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २७४ वर पोहोचला असून तो ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत आहे.

भारतीय हवामान विभागाने सोमवारी सकाळी धुके किंवा धुरके पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. किमान तापमान सुमारे २० अंश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी मुंबईच्या किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली. सांताक्रूझ वेधशाळेत १७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान हंगामी सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी कमी होते. तर कुलाबा वेधशाळेत २२.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. शनिवारी सांताक्रूझमध्ये १६.२ अंश, तर कुलाब्यात २१.८ अंश तापमानाची नोंद झाली होती.

हे ही वाचा:

गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली

बिसलेरीचे पाणी प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित

प्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देत दांपत्याला लुटले

मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

हवामानातील या बदलांमुळे सकाळी गारवा, तर दुपारी उष्णता असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. पुढील आठवडाभर किमान तापमान १९ ते २० अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळी धुके किंवा धुरके पडण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version