घरविशेषआता कॉक्रोच जनता पार्टीचा 'क्लब'

आता कॉक्रोच जनता पार्टीचा ‘क्लब’

देशभरात तरुणांसाठी चर्चा आणि सांस्कृतिक व्यासपीठ उभारणार

रस्त्यावरील आंदोलनांपलीकडे जात आता कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) देशभरात सांस्कृतिक आणि वैचारिक चर्चेची केंद्रे उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी पक्षाने नुकतीच ‘कॉक्रोच क्लब’ ही नवीन संकल्पना सुरू केली आहे. दुर्गम गावांसह देशाच्या प्रत्येक भागापर्यंत हे व्यासपीठ पोहोचवण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. तरुणांना सार्वजनिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारताचे भविष्य कसे असावे, याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रंका यांनी ‘द हिंदू’शी बोलताना सांगितले.

या क्लबचा पहिला कार्यक्रम २१ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. ‘लेगसी ऑफ बापू’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात ३०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विनोद, उपरोधिक सादरीकरण आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित चर्चांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्नांवरही सहभागी नागरिकांनी आपली मते मांडली. देशासमोरील व्यापक प्रश्नांवर भाष्य करणारी विविध सादरीकरणेही या कार्यक्रमाचा भाग होती.

या उपक्रमाविषयी बोलताना आशुतोष रांका म्हणाला की, हे असे व्यासपीठ आहे, जिथे सर्वजण एकत्र येऊन आपल्याला अपेक्षित असलेल्या भविष्याबाबत विचार मांडू शकतील आणि समाजासमोरील कठीण प्रश्नांवर चर्चा करू शकतील. ‘कॉक्रोच क्लब’च्या माध्यमातून लोकांना एकत्र येता येईल, चर्चा करता येईल, विचारमंथन करता येईल, एकमेकांसोबत सहकार्य करता येईल आणि आपल्या देशाचे स्वरूप कसे असावे, याची कल्पना मांडता येईल, अशी या संकल्पनेमागील भूमिका आहे.

हे ही वाचा:

‘भारतमाता मुर्दाबाद’ घोषणा देणाऱ्याला बंगालमध्ये अटक

‘भारताची सभ्यता आणि भाषिक विविधता अद्भुत’

चीन सीमेलगतच्या ४० गावांमध्ये लोकसंख्या वाढली

बहरीनमधील अमेरिकी तळावर इराणचा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला

पहिल्या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड का करण्यात आली, याबाबत विचारले असता रांकाने सांगितले की, महाराष्ट्रात आम्हाला मोठा पाठिंबा आहे. तसेच दिल्ली हे देखील संघटनेसाठी महत्त्वाचे केंद्र असून, लवकरच दिल्लीचाही या उपक्रमाच्या नियोजनात समावेश केला जाणार आहे. ‘कॉक्रोच क्लब’ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा विचार आहे. ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावरील चळवळ असून, देशातील विविध भागांतील लोकांना या उपक्रमाशी जोडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास यांनी सांगितले की, तरुण पिढीला एकत्र येण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपातील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘कॉक्रोच क्लब’ची संकल्पना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून तरुणांना विचारांची देवाणघेवाण करता येईल, प्रश्न विचारता येतील, नवीन गोष्टी शिकता येतील आणि वैचारिक प्रगल्भता विकसित करता येईल.

या क्लबमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध विचारवंतांच्या विचारांवर व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटांचे प्रदर्शन, थेट सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टँड-अप कॉमेडीचेही आयोजन करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना केवळ आंदोलनांपुरते मर्यादित न ठेवता वैचारिक आणि सांस्कृतिक चर्चांमध्ये सहभागी करून घेण्याचा सीजेपीचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version