घरविशेषपंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

भारत-नेपाळ मैत्रीचा ‘आध्यात्मिक’ अध्याय

भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंधांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची जोड असल्याचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या भेटीदरम्यान घडले. पंतप्रधान मोदी यांनी शाह यांना त्रिवेणीचे पवित्र जल भेट दिले. तर बालेन्द्र शाह यांनी पंतप्रधान मोदी यांना रुद्राक्षाची माळ आणि पशुपतिनाथ मंदिराचा प्रसाद दिला.

दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पार पडली. या बैठकीपूर्वी झालेल्या भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीने भारत आणि नेपाळमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याचे महत्त्व अधोरेखित केले.

भारत दौऱ्याच्या वेळी बालेन्द्र शाह यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांची गळाभेट घेतली. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर शाह यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले आणि त्यांना अभिवादन केले. राजघाटावरील कार्यक्रमानंतर शाह हैदराबाद हाऊसमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात ‘समृद्ध नेपाळ, समुन्नत भारत’ या संकल्पनेवर आधारित संयुक्त व्हिजन दस्तऐवज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील भविष्यातील सहकार्याची उद्दिष्टे आणि विकासाच्या योजनांना या दस्तऐवजातून दिशा मिळू शकते. तसेच ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रातील पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

चीनकडून बांगलादेशला क्षेपणास्त्र निर्मितीचा कच्चा माल?

ना विसावा, ना थांबा… अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, या चर्चेत व्यापार, वाहतूक, गुंतवणूक, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आर्थिक सहकार्य अधिक व्यापक आणि मजबूत करण्यावर दोन्ही देशांचा भर असेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version