घरस्पोर्ट्सभारताची अनाहत पुन्हा चमकली!

भारताची अनाहत पुन्हा चमकली!

सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्ड ज्युनियरच्या अंतिम चारमध्ये

भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंह हिने वर्ल्ड ज्युनियर वैयक्तिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये दमदार कामगिरी कायम राखत इतिहास रचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत इजिप्तच्या हबीबा रिजक हिचा ११-७, ११-५, ६-११, ११-९ असा पराभव करून अनाहतने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या विजयासह सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ती प्रबळ दावेदार मानली जात आहे.

महिला गटातील जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या अनाहतसमोर आता उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेह हिचे आव्हान असेल. सामेहने उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या हेलेन टँग हिचा सरळ गेममध्ये पराभव करून आगेकूच केली.

महिला गटातील अन्य उपांत्यपूर्व सामन्यांत इजिप्तच्या रुकैया सालेम हिने मलेशियाच्या व्हिटनी विल्सन हिचा पाच गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत पराभव केला, तर मलिका एलकराक्सी हिने बेल्जियमच्या सवाना मोक्सहॅम हिला सरळ गेममध्ये नमवले.

पुरुष गटात अव्वल मानांकित मोहम्मद जकारिया, सेफेल्डिन रेफे, एडम हवाल आणि मारवान असल यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. आता रेफे आणि जकारिया यांच्यातील उपांत्य सामना विशेष रंगतदार होण्याची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version