घरस्पोर्ट्सथॉमसची शतकी तोफ! ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंड फायनलमध्ये

थॉमसची शतकी तोफ! ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंड फायनलमध्ये

इंग्लंडने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. ६ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा सामना भारत-अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी होणार आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित षटकांत ७ गडी गमावून २७७ धावा केल्या. केवळ ३ धावांवर बेन डॉकिंस (१) बाद झाल्यानंतर बेन मेयस आणि जोसेफ मूर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. जोसेफने ३३ चेंडूत २५ धावा (१ षटकार, १ चौकार) केल्या, तर मेयसने ३३ चेंडूत २४ धावा केल्या.

६० धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर कॅलेब फाल्कनर आणि कर्णधार थॉमस रेव यांनी चौथ्या विकेटसाठी १३५ धावांची भक्कम भागीदारी करत डाव सावरला. थॉमसने १०७ चेंडूत ११० धावांची शानदार शतकी खेळी केली; यात १ षटकार आणि १४ चौकारांचा समावेश होता. फाल्कनरने ४० धावांचे योगदान दिले, तर फरहान अहमद २८ धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून हेडन शिलर आणि नादेन कूरे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर विल बायरोम आणि आर्यन शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

२७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ४७.३ षटकांत २५० धावांवर आटोपला. ४७ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार ओलिव्हर पीक आणि नितेश सॅम्युअल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी तुटताच ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा डगमगला.

हेही वाचा:

१६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीचा स्पेनचा प्रस्ताव

ठाणे सबज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे मनपा प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना २२ पदके

ईडीच्या ९५ प्रकरणात दोषसिद्धी, ५ हजार मनीलॉन्डरींग प्रकरणे दाखल

राहुल गांधी रवनीत बिट्टूंना म्हणाले, ‘गद्दार’…बिट्टूंनी प्रत्युत्तर दिले ‘देश के दुश्मन’!

ओलिव्हरने ८८ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह १०० धावांची झुंजार खेळी केली, तर नितेशने ४७ धावा केल्या. आर्यन शर्माने ३४ धावांचे योगदान दिले, पण संघाला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही.

इंग्लंडकडून सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लम्सडेन आणि राल्फी अल्बर्ट यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या, तर अ‍ॅलेक्स फ्रेंच आणि फरहान अहमद यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version