घरस्पोर्ट्सठाणे सबज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे मनपा प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना २२ पदके

ठाणे सबज्युनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे मनपा प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना २२ पदके

११ सुवर्णपदकांची कमाई

ठाणे जिल्हा सब ज्युनियर अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या (टीमसीएपीवाय) खेळाडूंनी या स्पर्धेत ११ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली. प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले सराव करत आहेत.

१० वर्षांखालील मुली – अन्वी मोरे यांनी स्टँडिंग शॉट पुटमध्ये रौप्य पदक जिंकले.

१४ वर्षांखालील मुली – काव्या कनागळे यांनी ८० मीटरमध्ये सुवर्ण आणि लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. इरा जाधव यांनी ३०० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. काव्या कनागळे, इरा जाधव, मायरा सबनीस आणि शुभ्रा करंदीकर यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक जिंकले.

८ वर्षांखालील मुले – युवान भावसार यांनी स्टँडिंग बोर्ड जंपमध्ये सुवर्ण आणि ५० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले.

१२ वर्षांखालील मुले – अर्चित मोरे यांनी ६० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. अर्चित मोरे, अक्षित नायर, आरव कर आणि लियाम फर्नांडिस यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक जिंकले.

हे ही वाचा:

कृषि आणि शेतकऱ्यांच्या हिताला कोणताही धक्का लागणार नाही!

भारताला अमेरिकेसोबत सर्वोत्तम व्यापार करार

गोवा विशेष: विकासाला गती देणारा अर्थसंकल्प

एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान सुरक्षित

१४ वर्षांखालील मुले – स्नेह कामेरकरने ८० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. आरव विनेरकरने ३०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ८० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. स्नेह कामेरकर, आरव विनेरकर, आदित बोंद्रे आणि स्पर्श पाटील यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले.

“सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ७ खेळाडूंची निवड झाली आहे. आगामी स्पर्धेत सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे, असे म्हणत मीनल पलांडे आणि अशोक आहेर (टीएमसीपीवाय – योजना प्रमुख) यांनी सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version