घरस्पोर्ट्समीराबाई चानूने १९९८नंतर जिंकून दिले आशियाई स्पर्धेतले पहिले पदक

मीराबाई चानूने १९९८नंतर जिंकून दिले आशियाई स्पर्धेतले पहिले पदक

४९ किलो वजनी गटात जिंकले रौप्यपदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. मीराबाईने २८ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत भारताला वेटलिफ्टिंगमध्ये १९९८ नंतरचे पहिले आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक मिळवून दिले आहे.

४९ किलो वजनी गटात मीराबाईने एकूण १९८ किलो वजन उचलत आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पहिले पदक पटकावले. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला पदक मिळवण्यात अपयश आले होते आणि ती चौथ्या स्थानावर राहिली होती.

स्नॅच फेरीतील पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८३ किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८५ किलो वजन यशस्वीपणे उचलले. तिसऱ्या प्रयत्नात तिने ८७ किलो वजन उचलत आपली कामगिरी आणखी मजबूत केली. क्लीन अँड जर्क फेरीतही मीराबाईची कामगिरी शानदार राहिली. पहिल्या प्रयत्नात तिने १०७ किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने १११ किलो वजन उचलण्यात यश मिळवले.

हे ही वाचा:

बेल्जियममधून येणाऱ्या ‘कन्व्हर्जन फंडिंग’चा पर्दाफाश

अदृश्य सुरक्षा चक्र श्री गणेश कवच!

एनएसईने आणला शेअर निवडीचा ‘लेन्स’

महानदीतल्या खोल विहीरीत सापडला नैसर्गिक वायू

मात्र, मीराबाईचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. उत्तर कोरियाच्या री सोंग-गम हिने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील यापूर्वीचे शेवटचे पदक १९९८ मध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी जिंकले होते. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या कोणत्याही वेटलिफ्टरला पदक मिळवता आले नव्हते. मीराबाईच्या रौप्यपदकामुळे तब्बल २८ वर्षांनंतर भारताचा हा पदकाचा दुष्काळ संपला आहे.

मीराबाई चानूने स्वतःचाही आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाचा दुष्काळ संपवला आहे. २०१४ मध्ये ती नवव्या स्थानावर राहिली होती. त्यानंतर जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे तिला सहभागी होता आले नव्हते. हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मीराबाईने ४९ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. मात्र, तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि पदक थोडक्यात हुकले.

मीराबाई चानूने यापूर्वी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये तिने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदकामुळे मीराबाई चानूच्या पदकांच्या यादीत आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीची भर पडली आहे आणि भारताच्या वेटलिफ्टिंगमध्ये २८ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकाची प्रतीक्षा संपली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version