घरस्पोर्ट्सधाराशिव, पुणे, ठाणे, मुंबई शहर, उपनगरचा बाद फेरीत प्रवेश

धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबई शहर, उपनगरचा बाद फेरीत प्रवेश

राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धा

६२ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवसाअखेर अनेक बलाढ्य संघांनी आपली आगेकूच कायम ठेवली. धाराशिव, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली, उपनगर, सातारा, सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यांच्या पुरुष व महिला संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. यजमान अहिल्यानगरच्या महिला संघासह रत्नागिरीच्या महिला संघानेही बाद फेरी गाठली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने आणि एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने मा. आ. स्व. अरुणकाका जगताप क्रीडा नगरीतील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे ही स्पर्धा सुरू आहे.

पुरुषांच्या अ गटातील रत्नागिरी आणि जळगाव यांच्यातील सामना चांगलाच रंगला. निर्धारित डावांअखेर दोन्ही संघ ३२-३२ असे बरोबरीत राहिल्यानंतर जादा डाव खेळविण्यात आला. त्यामध्ये जळगावने १६-१२ अशी बाजी मारत चार गुणांनी विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात सोलापूरने परभणीचा ३५-१८ असा एक डाव राखून १७ गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगरने लातूरवर ४८-४ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळविला.

हे ही वाचा:

हुंड्यात थारची मागणी, मुलीच्या कुटुंबीयांनी दिली खेळण्यातील गाडी

पेरियार यांचा पुतळा हटवल्याने विजय जोसेफ सरकारला पुन्हा दणका

दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवनाचा प्रकार

सिक्कीमच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा

महिला गटात पायल पवार हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रत्नागिरीने मुंबईचा ४४-३० असा १४ गुणांनी पराभव केला. श्रेया संगारे हिने संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. मुंबईकडून जानवी लोंढेची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबई उपनगरने धुळेचा ३३-२८ असा पाच गुणांनी पराभव केला. मुंबई उपनगरकडून देविका अहिरे, आर्या भाटकर चमकल्या तर धुळेकडून नंदिनी सिसोदिया हिने उल्लेखनीय कामगिरी केली.

पुरुष गटात ठाणेने नंदुरबारवर ३८-२४ असा एक डाव राखून १४ गुणांनी विजय मिळविला. ठाण्याकडून प्रथमेश दुर्गावले तसेच शुभम उत्तेकर चमक दाखविली. नंदुरबारच्या मोहित पडवीने प्रतिकार केला. मुंबईने नाशिकला ४२-२६ असे १६ गुणांनी हरविले. मुंबईच्या प्रतीक घाणेकर, हितेश आंग्रे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. नाशिककडून किरण जाधवने आणि ओम कांगणे याने प्रतिकार केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version