न्यूझीलंडची एकूण आघाडी २४३ धावांवर पोहोचली असून, अद्याप संघाचे सात गडी शिल्लक आहेत. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार टॉम लॅथम अवघ्या ८ धावा करून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी ४१ धावांची भागीदारी केली. निकोल्स २२ धावा करून बुमराहचा दुसरा बळी ठरला.
डेव्हॉन कॉनवेने शानदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. ९७ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालकडे झेल देऊन तो माघारी परतला. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल या जोडीने न्यूझीलंडला आणखी धक्का बसू दिला नाही. रचिन आणि मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत ४० धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. रचिन ४६ धावांवर खेळत असून, डॅरिल मिचेल ५ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.
हे ही वाचा:
‘भारताची प्रगती, नारीशक्तीच्या स्वप्नांना नवे बळ’
कोलकात्यात १६ रस्त्यांची नावे बदलण्याची तयारी
आम्ही एट्टप्पन नाही, कट्टबोमन आहोत, म्हणत स्टॅलिनचा राहुलना चिमटा
लग्नसराई – सणासुदीच्या खरेदीमुळे महागाईचा धोका वाढणार
यापूर्वी, भारतीय संघाचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला. भारताकडून ध्रुव जुरेलने शानदार फलंदाजी करत ८८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आठव्या विकेटसाठी आकाश दीपसोबत ४६ धावांची भागीदारी केली, तर नवव्या विकेटसाठी गुरनूर बरारसोबत ६४ धावा जोडल्या.
आकाश दीपने २९ धावांचे योगदान दिले, तर केएल राहुलने २५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना काइल जेमिसनने सर्वाधिक चार बळी घेतले. नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. पहिल्या डावाच्या आधारावर न्यूझीलंडने ११० धावांची मोठी आघाडी घेतली होती. न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर संपुष्टात आला होता.
