घरस्पोर्ट्सभारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 'गुड न्यूज'

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल याने रविवारी पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केला.

गिलला गुरुवारी सराव सत्रादरम्यान फलंदाजी करताना उजव्या हाताच्या अनामिका बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध सुरू असलेल्या सराव सामन्यात तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नव्हता. दुखापतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून तो पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नव्हता. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले होते की, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खबरदारी म्हणून गिल पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करणार नाही. मात्र, दुसऱ्या दिवशीही शुभमन फलंदाजीसाठी मैदानात आला नाही. त्याच्या जागी रवींद्र जडेजाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली.

हे ही वाचा:

सर्जरीच्या वेळी सोनू निगमने गायले रफींचे गाणे, व्हिडिओ व्हायरल

काकोरी दरोडा नव्हता, ती तर स्वातंत्र्यासाठीची क्रांतिकारकांची ‘ट्रेन कारवाई’

भारतात मेटाची मनमानी चालणार नाही

चाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा

मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधाराच्या उपलब्धतेबाबतची चिंता सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दूर झाली. २६ वर्षीय गिलने साइड नेट्समध्ये बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. यादरम्यान त्याने वेगवान गोलंदाज तसेच फिरकी गोलंदाजांचा सामना केला आणि त्याला कोणतीही अडचण जाणवत नसल्याचे दिसून आले.

१५ ऑगस्टपासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर पहिली कसोटी सुरू होणार आहे. त्याआधी गिलने सरावाला सुरुवात केल्याने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलंबो येथे रविवारी सराव सामना संपल्यानंतर भारतीय संघ गॉलसाठी रवाना होणार आहे.

मालिकेतील दुसरी आणि अखेरची कसोटी २३ ते २७ ऑगस्टदरम्यान कोलंबो येथील ऐतिहासिक सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवली जाणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर असलेल्या भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आपल्या शक्यता वाढवण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी लागणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version