घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनीतेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका

नीतेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका

मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून लफडी सुरू आहेत, परंतु महायुतीही काही आलबेल नाही. भाजपा आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केलेली आहे. मशीदीत घुसून मारू… वगैरे भाषेबाबत नापसंती व्यक्त केली आहे. अर्थात अजितदादांनी मीडियासमोर तसे काही विधान केलेले नाही. नीतेश यांनीही त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. सगळा मामला सूत्रांचा आहे. तरीही असे घडले असेल असे मानायला वाव आहे. नीतेश यांच्या भाषेमुळे अजितदादांना काही समस्या होत असेल. परंतु ती त्यांची त्यांनी सोडवावी. भाजपाने, त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. भाजपा नेतृत्वानेही नीतेश यांचा किरीट सोमय्या करण्याचा प्रयत्न करू नये.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version