भारताबाबत हे भाकीत तर बाबा वेंगा पेक्षा भारी…

भारताबाबत हे भाकीत तर बाबा वेंगा पेक्षा भारी... | Dinesh Kanji | Donald Trump | Narendra Modi |

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी लादलेल्या २५ टक्के टेरीफवर आणखी २५ टक्के टेरीफ जाहीर केले आहे. ट्रम्प धमकीची घोषणा करतात. एक धमकी संपते न संपते तोवर दुसऱ्या धमकीचे सुतोवाच करतात. म्हणजे एकता कपूरच्या सिरीयल सारखे. एपिसोड संपवताना शेवटी नवा ट्वीस्ट, जो प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरले. ट्रम्प यांच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातील उड्यांचे गुपित कोणाला उलगडत नाही. त्यांच्या अस्वस्थतेचे कारणही कळत नाही. कदाचित त्यांना शंभर वर्षांपूवीचे एक व्यंगचित्र छळते आहे. जे एका कम्युनिस्ट व्यंगचित्रकाराने काढले होते. रॉबर्ट बर्कले उर्फ बॉब माइनर हे एक प्रसिद्ध अमेरिकन राजकीय व्यंगचित्रकार, पत्रकार आणि अमेरिकेतील कम्युनिस्ट पार्टी चे प्रमुख सदस्य होते. त्यांचा जन्म १८८४ मध्ये सॅन अँटोनियो, टेक्सास येथे झाला. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी एक सामान्य वृत्तपत्र कर्मचारी म्हणून केली. लवकरच ते एक प्रतिभावान व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये ते भांडवलशाही आणि साम्राज्यवादावर टीका करत असत.

Exit mobile version