घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगोपाळगडचा बळी कुणी दिला? |

गोपाळगडचा बळी कुणी दिला? |

मित्रांनो, आजचा विषय फक्त एका किल्ल्याचा नाही. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा. आणि आजचा विषय आहे त्या संतापाचा जो आज संपूर्ण महाराष्ट्रात धगधगत आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात, अंजनवेलच्या समुद्रकिनारी दिमाखात उभा असलेला गोपाळगड किल्ला अचानक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण एका व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. त्या व्हिडिओमध्ये एका पर्यटकाचा आणि तेथील जागेवर हक्क सांगणाऱ्या अयाज मणीयार नावाच्या व्यक्तीचा वाद होताना दिसतो. वादाचे कारण काय? तर किल्ल्याच्या परिसरात पडलेला आंबा. पण हा वाद आंब्यापुरता मर्यादित राहिला नाही. कारण वादादरम्यान हा किल्ला ही जागा आमच्या मालकीची आहे, असा दावा अयाज मणीयार यांनी केला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर एकच प्रश्न घुमू लागला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर खाजगी मालकीचा दावा कसा काय होऊ शकतो? आणि कोण करतोय तर मणीयार. मात्र या संपूर्ण प्रकरणाला खऱ्या अर्थाने संताप उसळला तो त्या व्हायरल व्हिडिओने. गोपाळगडावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा अयाज मणियार यांच्याशी वाद झाला. वाद वाढत गेला आणि त्याचवेळी मणियार यांनी हा किल्ला आणि ही जागा आमच्या मालकीची आहे, असा दावा केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. त्यानंतर त्या तरुणाने एक साधा पण थेट प्रश्न विचारला – जर हा किल्ला तुमच्या मालकीचा असेल, तर त्याबाबतचा फलक कुठे आहे? त्यावर मणियार यांनी फलक लावण्याची गरज नाही, माहिती हवी असेल तर आरटीआय टाका आणि माहिती काढा, अशा आशयाचे उर्मट उत्तर दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. आणि इथूनच महाराष्ट्रभर चर्चेचा स्फोट झाला. आणि इथे त्या तरुणाच्या धाडसाचं कौतुक करावंच लागेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version