घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?

आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?

महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना मुंबईतील नाईट लाईफची चिंता करणारे उबाठा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे सध्या मुंबईतील बहुमजली झोपडयांची चिंता वाहतायत. बहुमजली झोपड्या एसआरएसाठी पात्र करून घ्या, अशी मागणी आदीत्य ठाकरे यांनी केलेली आहे. मुंबईतील बहुमजली झोपड्या बेहराम पाडा, भारत नगर, मदनपूरा, बैंगनवाडी अशा मुस्लीम बहुल भागात आहेत. मुंबईकर ही बाब ओळखून आहेत. त्यामुळे आदीत्य ठाकरे यांना त्यांची चिंता असणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हेच लोक उबाठा शिवसेनेच्या पाठीशी उभे होते. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवाज उठवणारे ठाकरे आता अल्पसंख्यांच्या अनधिकृत मोहल्ल्यांसाठी कंबर कसून उभे आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version