घरविशेषमुंब्रातील मशिदी-मदरशांवर ५०० भोंगे बेकायदेशीर!

मुंब्रातील मशिदी-मदरशांवर ५०० भोंगे बेकायदेशीर!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती 

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासाठी मशिदीवरील भोंगे एक ‘व्होट जिहाद’ अभियान आहे. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि ध्वनी प्रदूषण बंद झाले पाहिजे. बेकायदेशीर भोंग्यांविरोधात मी आवाज उठवत आहे. ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि पुण्याला जाणार असून तेथील पोलिसांना अनधिकृत भोंग्यांविरोधात कारवाई करण्यास सांगणार आहे. महाराष्ट्र भोंगे मुक्त झालाच पाहिजे, असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले.

ठाण्यातील विविध पोलिस ठाण्यांना भेट देवून बेकायदेशीर लाऊडस्पीकरविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंब्रा परिसरातील मोठ्या संख्येने मशिदींमध्ये बसवण्यात आलेल्या लाऊडस्पीकरवर सोमय्या यांनी गंभीर आक्षेप घेतला.

ते म्हणाले की, मुंब्रा पोलिसांच्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये सुमारे ११२ मशिदी आणि ३३ मदरसे आहेत. यामध्ये अनेक मशिदींवर चार, पाच आणि सहा असे भोंगे लावले आहेत. बहुतेकांनी परवानगीशिवाय ५०० हून अधिक लाऊडस्पीकर बसवले आहेत.

दरम्यान, सोमय्या यांनी ट्वीटकरत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाडा, अचलपुर, सरमसपुरा, चांदुर बाजार, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी ह्या पोलिस ठाणे परिसरात १४८ मशीद १८६ भोंगे/लाऊडस्पिकर असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, एकही मशिदीने परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस आता पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version