घरविशेषआदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवलीय, कधीही डिबेटसाठी तयार!

आदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवलीय, कधीही डिबेटसाठी तयार!

शिवसेना शिंदेंच्या मिलिंद देवरा यांचे आवाहन

निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून पक्षांकडून सभा, प्रचारफेऱ्या, मुलाखती सुरु आहेत. नेत्यांकडून एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, टीका, टिप्पणी होत आहे. याच दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि वरळी मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी विरुद्ध उबाठाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना आवाहन केले आहे. आदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवली असून त्यांच्यासोबत डिबेटसाठी कधीही तयार आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

मिलिंद देवरा म्हणाले, डिबेट न करणारे उमेदवार घाबरतात असे आदित्य ठाकरे लोकसभेवेळी म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना आवाहन करत देवरा म्हणाले, ४८ तास उलटून गेले मात्र, मला कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. म्हणून आदित्य ठाकरेंसाठी एक रिकामी खुर्ची ठेवली आहे, त्यांनी कधीही ठरवावं, वैयक्तिक गोष्टीवर डिबेट न करता महायुतीचे व्हिजन काय? यावर डिबेट करू. आदित्य ठाकरेंनी कधीही यावे मी डिबेटसाठी तयार आहे, असे मिलिंद देवरा म्हणाले.

दरम्यान, या निवडणुकीत वरळी मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा मैदानात आहेत. मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात आहेत. तर उबाठा गटाकडून आदित्य ठाकरेंना उमेदवारी दिली आहे.

हे ही वाचा : 

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

गृहमंत्री शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, म्हणाले, भाजपा सर्व नियमांचे पालन करते!

कॅनडामध्ये खलिस्तानी मोर्चात सामील झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्लीन चीट

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version